PAK vs ENG Final : इंग्लंडच्या खेळाडूंच्या हाताला काळी पट्टी, ‘हे’ आहे कारण!

WhatsApp Group

T20 World Cup 2022 PAK vs ENG Final : ‘इंग्लिश क्रिकेटचे गॉडफादर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या डेव्हिड इंग्लिश यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे आज रविवारी टी-२० विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडच्या संघाने दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या. डेव्हिड इंग्लिश यांच्या बनबरी स्कूल्स फेस्टिव्हलने देशाला १२५ हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह १००० हून अधिक प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या करिअरला चालना देण्यात मदत केली आहे.

पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लिश कप्तान जोस बटलर यांनीही डेव्हिड इंग्लिश यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने ट्विटरवर म्हटले की, ”डेव्हिड इंग्लिश यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. जीवनातील महान मानवांपैकी एक, त्याच्याबरोबर वेळ घालवणे खूप आनंददायक होते. त्याच्या शानदार बॅनबरी फेस्टिव्हलने इंग्लंडला काही उत्कृष्ट इंग्लिश क्रिकेटपटू दिले, त्याच्या आत्म्याला शांती लाभो.”

हेही वाचा – भारत बदलतोय..! जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर विक्रमी मतदान; कडाक्याच्या थंडीतही बजावला हक्क

३० वर्षांपूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान ५० षटकांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारत जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळवला, तर इंग्लंडच्या जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या सलामीच्या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत भारतावर १० गडी राखून विजय मिळवला.

दोन्ही संघांची Playing 11

इंग्लंड – जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन.

पाकिस्तान – मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

 

Leave a comment