T20 World Cup 2022 : शाब्बाश आयर्लंड..! जगज्जेता विंडीज संघ वर्ल्डकपबाहेर

WhatsApp Group

T20 World Cup 2022 : आयर्लंड क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये दणदणीत प्रवेश केला आहे. अँड्र्यू बालबिर्नीच्या नेतृत्वाखालील आयर्लंड क्रिकेटसाठी आज म्हणजेच शुक्रवार (२१ ऑक्टोबर) हा दिवस खूप खास आहे. या संघाने दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा (IRE v WI) ९ विकेट्सने धुव्वा उडवला आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दौऱ्यातून त्यांना वगळले. गेल्या पाच टी-२० विश्वचषक स्पर्धेत हा संघ पहिल्या फेरीतच बाद व्हायचा, पण आयरिश खेळाडूंचे कौतुक करावे लागेल ज्यांनी केवळ सामना जिंकला नाही तर सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करून मन जिंकले.

आयर्लंडसाठी हा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. सामूहिक प्रयत्नातून त्यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला. फिरकी गोलंदाज गॅरेथ डेलनीच्या तगड्या गोलंदाजीमुळे आयर्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या विंडीज संघाला ५ बाद १४६ धावांवर रोखले. विंडीजकडून ब्रँडन किंगने ४८ चेंडूत नाबाद 62 ६२ केल्या. डेलनीने चार षटकांत १६ धावांत ३ बळी घेतले. यानंतर सलामीवीर पॉल स्टर्लिंगच्या नाबाद ६६ धावांच्या जोरावर आयर्लंडने १५ चेंडू बाकी असताना एका विकेटवर १५० धावा करून सामना जिंकला.

हेही वाचा – फ्रान्सच्या किनाऱ्यावर उभारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा? विधानसभा अध्यक्षांची गृहमंत्र्यांशी चर्चा!

यापूर्वी २००७ च्या टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. २००९ च्या टी-२० विश्वचषकात कॅरेबियन संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले होते, तर २०१० मध्ये ते सुपर ८ मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाले होते. २०१२ मध्ये, वेस्ट इंडिज संघ डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनला होता, तर २०१४ मध्ये त्यांनी उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. २०१६ मध्ये कॅरेबियन संघ पुन्हा चॅम्पियन बनला. गेल्या वर्षी २०२१ मध्ये, विंडीज संघ सुपर १२ मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला होता, तर यावर्षी म्हणजेच २०२२ मध्ये त्यांचा प्रवास पहिल्या फेरीत संपला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment