T20 World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये कोण कोणाशी खेळणार? भारताची मॅच कधी? वाचा इथं!

WhatsApp Group

T20 World Cup 2022 Semifinal Schedule : टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताने झिम्बाब्वेला सहज मात देत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात२० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला १७.२ षटकात सर्वबाद ११५ धावांपर्यंत पोहोचता आले. भारताने ७१ धावांनी मोठा विजय मिळवला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा (३४) आणि रायन बर्ल (३५) वगळता एकाही फलंदाजाना खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. भारताकडून अश्विनने सर्वाधिक ३ बळी घेतले. शमी, पंड्या यांना २-२ तक भुवनेश्वर आणि अर्शदीप यांना १-१ बळी मिळाला.

हेही वाचा – रस्त्यावर ‘सलमान’ आणि ‘शाहरुख’चं भांडण, मग झाला गोळीबार..!

सेमीफायनलमध्ये काय होणार?

आता ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान तर ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड पात्र झाले आहेत. आता पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड याच्यात रंगेल.

  • पहिला सेमीफायनल – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, सिडनी – ९ नोव्हेंबर
  • दुसरा सेमीफायनल – भारत विरुद्ध इंग्लंड, अॅडलेड – १० नोव्हेंबर

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment