T20 World Cup 2022 IND vs ZIM : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात आज रविवारी भारताचा शेवटचा सुपर-१२ सामना होत आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेशी भिडत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्याआधीच सेमीफायनलमध्ये पाऊल ठेवले आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर भारताचा सेमीफायनलमध्ये मार्ग पक्का झाला.
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत आणि पाकिस्तान गट-२ मधून पात्र ठरले आहेत, तर गट-१ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
Toss update from Melbourne 🏟
India have opted to bat against Zimbabwe in the final Super 12 clash 🏏#T20WorldCup | #ZIMvIND |📝: https://t.co/SFsHINI2PL pic.twitter.com/E7Sf2EsslJ
— ICC (@ICC) November 6, 2022
हेही वाचा – गूड न्यूज..! आलिया भट्ट-रणबीर कपूरला झाली मुलगी; वाचा!
If India beat Zimbabwe or the match is rained-off then Pakistan will play New Zealand.
If India lose to Zimbabwe then Pakistan will face England.#T20WorldCup
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) November 6, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
झिम्बाब्वे – वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (कप्तान), रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.