IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये पाऊस पडणार? वाचा कसं असणार हवामान

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs SA Weather Report : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (३० ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकातील ३० वा सामना रंगणार आहे. हा सामना पर्थ येथे होणार आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य आफ्रिकन संघाला पायदळी तुडवण्यासाठी उतरणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यात बांगलादेशला पराभूत केले होते. झिम्बाब्वेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाहून गेला होता.

गुणतालिकेत दोन्ही संघांचे स्थान पाहता भारत दोन सामन्यांत चार गुणांसह गट-२ मध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट +१.४२५ आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट +५.२०० आहे. झिम्बाब्वेचे देखील दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीचे तीन गुण आहेत, परंतु नेट रन रेटमध्ये (+०.०५०) मागे आहेत.

हेही वाचा – कुणकेश्वरच्या विकासासाठी निधी मिळणार? नितेश राणेंनी घेतली CM शिंदेंची भेट!

सामन्यादरम्यान पाऊस पडेल का?

पर्थमधील सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. Weather.com नुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान १३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील.

Leave a comment