T20 World Cup 2022 IND vs SA Virat Kohli Dropped Catch : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पर्थच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरला. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि सुरुवातीलाच धक्के दिले. लुंगी एनगिडीच्या घातक गोलंदाजीसमोर भारताच्या पाच विकेट ४९ धावांत पडल्या. सूर्यकुमार यादवने पहिला डाव सांभाळला आणि नंतर संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. लुंगी एनगिडीने ४ तर वेन पारनेलने ३ फलंदाजांना बाद केले.
विराटने सोडला कॅच
यानंतर भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेला लवकर धक्के दिले. मधल्या फळीत एडन मार्करामने डाव सांभाळला. यादरम्यान विराटने मार्करामचा सोपा झेल सोडला. १२व्या षटकात अश्विनच्या चेंडूवर मार्करामने हवेत फटका खेळला. मिड विकेटला असलेल्या विराटला हा सोपा झेल पकडता आला नाही. यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले.
This is very very rare Virat Kohli drops a catch. pic.twitter.com/PpFRrBR4ap
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 30, 2022
Shame @imVkohli !!??? pic.twitter.com/lEeFSTlEqw
— time square 🇮🇳 (@time__square) October 30, 2022
हेही वाचा – आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका..! ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Virat Kohli might just have knocked Pakistan out of another World Cup #T20WorldCup #INDvSA pic.twitter.com/WUwpitrpkh
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) October 30, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कप्तान), रायली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया.