T20 World Cup 2022 IND vs SA : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ब्लॉकबस्टर सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आधी स्पर्धेतील दोन्ही सामने जिंकले आहेत, स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला मात दिली.
हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करणे हे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. मात्र, बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवल्यानंतर आफ्रिकन संघ आत्मविश्वासाने भरलेला असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सोपा होणार नाही. अशा स्थितीत भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी तिन्ही विभागात चांगला खेळ दाखवावा लागेल.
हेही वाचा – BAN Vs ZIM : बांगलादेश जिंकल्यानंतर अंपायरनं पुन्हा सुरू केली मॅच..! पाहा नक्की काय घडलं
Pakistan are off the mark at the #T20WorldCup and still in with a chance of qualifying for the semi-finals after beating Netherlands by six wickets 🇵🇰🇳🇱
They must now defeat South Africa and Bangladesh and hope other results go their way… pic.twitter.com/Jxu6MzxWv7
— Sky Sports Cricket (@SkyCricket) October 30, 2022
दोन्ही संघात बदल
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय प्लेइंग-११ मध्ये अक्षर पटेलच्या जागी दीपक हुडाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात एक बदल केला आहे. तबरेझ शम्सीच्या जागी लुगी एनगिडीला स्थान देण्यात आले आहे.
🚨 Toss & Team News from Perth 🚨@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against South Africa. #T20WorldCup | #INDvSA
Follow the match ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6
1⃣ change to our Playing XI as @HoodaOnFire is named in the team 🔽 pic.twitter.com/X9n5kLoYNn
— BCCI (@BCCI) October 30, 2022
TEAM ANNOUNCEMENT 🚨
1⃣ Solitary change
➡️ Lungi Ngidi is brought in
⬅️ Tabraiz Shamsi misses out🇮🇳 India have won the toss and will bat first
🗒️ Ball by ball https://t.co/KNz7vLG39F
📺 SuperSport Grandstand 201#INDvSA #T20WorldCup #BePartOfIt pic.twitter.com/12nN3wtcpb— Proteas Men (@ProteasMenCSA) October 30, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कप्तान), रायली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया.