

T20 World Cup 2022 IND vs PAK Rahul Dravid Celebration : सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा असा पराभव केला की या विजयाचा आनंद वर्षानुवर्षे मावळणार नाही. विराट कोहलीच्या ८२ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानवर चार विकेट्सनी मात केली. या विजयानंतर मैदानावर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या विजयानंतर विराट कोहलीपासून कर्णधार रोहित शर्मापर्यंत सगळेच भावूक झाले. पण या विजयानंतर भारतीय संघाचे शांत स्वभावाचे प्रशिक्षक राहुल द्रविडचे रागारागातील सेलिब्रेशन व्हायरल झाले आहे.
रवीचंद्रन अश्विनने विजयी फटका खेळताच, भारतीय खेळाडू धावतच मैदानावर पोहोचले. यादरम्यान राहुल द्रविड संघाच्या डगआऊटमध्ये खेळाडूंसोबत मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करताना दिसला. द्रविडची अशी प्रतिक्रिया याआधी कदाचित कुणीच पाहिली नसेल. एवढेच नाही तर मैदानाबाहेर गेल्यावर विराट आत जात असताना द्रविडने मागून जाऊन त्याला मिठी मारली. यादरम्यान त्याने विराटचे खूप कौतुकही केले.
हेही वाचा – CM शिंदेंकडून आनंदाची बातमी..! सिडकोकडून ७८४९ घरांची सोडत जाहीर
A packed MCG chanting for Virat Kohli
![]()
Raw vision: Behind the scenes of India’s sensational win
![]()
Goosebumps. #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/MNjmOLKO7r
— ICC (@ICC) October 23, 2022
असा रंगला सामना…
विराट कोहली (नाबाद ८२) आणि हार्दिक पंड्या (४०) यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेटमध्ये टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ गटातील सामन्यात पाकिस्तानला ४ गड्यांनी हरवले. यासोबतच गेल्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा बदलाही भारताने घेतला. पाकिस्तानच्या ८ बाद १५९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १६० धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानकडून हारिस रौफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी दोन, तर नसीम शाहने एक विकेट घेतली.