T20 World Cup 2022 IND vs NED : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेमध्ये आज आज (२७ ऑक्टोबर) टीम इंडियाचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता हा सामना सुरू होईल. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच त्यावर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. वास्तविक, सिडनीमध्ये अचानक वातावरणात बदल झाला आणि गुरुवारी सकाळपासून वादळासह जोरदार पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत पावसामुळे भारत-नेदरलँड्स सामन्यावर संकट ओढवू लागले आहे.
Accuweather नुसार, गुरुवारी सिडनीमध्ये ४० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ४० किमी/तास असेल. तर आकाश २६ टक्क्यांपर्यंत ढगाळ राहील. भारतीय संघाच्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार, पाऊस पडला आणि थोडासा सामना झाला तर काहीही होऊ शकते. अशा स्थितीत भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.
हेही वाचा – ६७ वर्षांनंतर पहिल्यांदा अंघोळ केली आणि ‘त्यांचा’ मृत्यू झाला!
Preps ✅#TeamIndia ready to hit the ground running. 👍 👍#T20WorldCup | #INDvNED pic.twitter.com/5P1GRAOzmf
— BCCI (@BCCI) October 27, 2022
सिडनीमध्ये गुरुवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला, मात्र काही वेळाने थांबला. यानंतर या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा सामना सुरू झाला. मात्र, पुन्हा पावसामुळे हा सामनाही ६ षटकांचा थांबवण्यात आला. Aquaweather च्या म्हणण्यानुसार, सिडनीमध्ये दुपारनंतर मधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची संभाव्य Playing 11
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन/युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.
नेदरलँड्स संघ: मॅक्स ओ’डॉड, विक्रमजीत सिंग, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, स्कॉट एडवर्ड्स (सी/डब्ल्यू), टिम प्रिंगल, टिम व्हॅन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, शरीझ अहमद/रूलोफ व्हॅन डर मर्व्ह.