IND vs ENG Semifinal : इंग्लंडनं जिंकला टॉस..! रोहितच्या मनासारखा निर्णय; वाचा Playing 11

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडिया आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. हा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माला प्रथम फलंदाजी करायची होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे.

या अॅडलेडच्या मैदानावर आतापर्यंत ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या वेळी या मैदानावर कोणत्याही संघाने नाणेफेक जिंकली असली, तरी त्यांना सामना जिंकता आलेला नाही.
टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत त्यांनी अॅडलेडच्या मैदानावर दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतीय संघाने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. म्हणजेच या मैदानावर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी पूर्ण १०० आहे. मात्र, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतरच हे शक्य झाले आहे. या मैदानावरील इंग्लंड संघाचाही अजिंक्य विक्रम आहे.

हेही वाचा – मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवरील नुकसानग्रस्त दुकानदारांना प्रत्येकी २ लाखांची मदत!

दोन्ही संघांची Playing 11 –

भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

इंग्लंड : जोस बटलर (यष्टीरक्षक/कप्तान ), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment