T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जात आहे. इंग्लंडचा कप्तान जोस बटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल या भारतीय फलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. विराट कोहली पुन्हा तारणहार ठरला. त्याला हार्दिक पंड्याची सुंदर साथ लाभली. दोघांनी अर्धशतक ठोकले. भारताने इंग्लंडला १६९ धावांचे आव्हान दिले आहे.
भारताचा डाव
सलामीवीर केएल राहुल (५) महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. त्यानंतर रोहित शर्माने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. आज पहिला सामना खेळत असलेल्या ख्रिस जॉर्डनने त्याला फसवले. या स्पर्धेत चांगल्या लयीत खेळणाऱ्या सूर्य़कुमार यादवलाही (१४) खास करता आले नाही. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने संघाला शतकापार नेले. १८व्या षटकात विराट अर्धशतक ठोकून बाद झाला. विराटने ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. १९व्या षटकात हार्दिकने अर्धशतक पूर्ण केले. २० षटकात भारताने ६ बाद १६८ धावा केल्या. हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेट झाला. त्याने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ३ बळी घेतले.
A terrific half-century from Hardik Pandya helps India set a target of 169 💪#INDvENG | 📝: https://t.co/PgKzpNrdvB
Head to our app and website to follow the #T20WorldCup action 👉 https://t.co/76r3b73roq pic.twitter.com/zTbSeCN9Dp
— ICC (@ICC) November 10, 2022
FIFTY for @imVkohli 👏👏
This is his fourth half-century in the #T20WorldCup 2022.
Live – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/1YuFExAhmg
— BCCI (@BCCI) November 10, 2022
हेही वाचा – मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन..! ड्रोनच्या वापरावर बंदी; अलर्ट जारी!
FIFTY for @hardikpandya7 off 29 deliveries 💪🔥
Live – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/pGnZvT91c0
— BCCI (@BCCI) November 10, 2022
दोन्ही संघांची Playing 11 –
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : जोस बटलर (यष्टीरक्षक/कप्तान ), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.