T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला १० गड्यांनी सहज मात दिली. या सामन्यात इंग्लंडचा कप्तान जोस बटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल या भारतीय फलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. विराट कोहली पुन्हा तारणहार ठरला. त्याला हार्दिक पंड्याची सुंदर साथ लाभली. दोघांनी अर्धशतक ठोकले. भारताने इंग्लंडला १६९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सरलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी दे-दणादण फलंदाजी करत १६ षटकातच १७० धावा करत विजय मिळवून दिला. या दोघांसमोर भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. बटलरने ९ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८० तर हेल्सने ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ८६ धावा केल्या.
भारताचा डाव
सलामीवीर केएल राहुल (५) महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. त्यानंतर रोहित शर्माने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. आज पहिला सामना खेळत असलेल्या ख्रिस जॉर्डनने त्याला फसवले. या स्पर्धेत चांगल्या लयीत खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही (१४) खास करता आले नाही. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने संघाला शतकापार नेले. १८व्या षटकात विराट अर्धशतक ठोकून बाद झाला. विराटने ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या.
हेही वाचा – मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन..! ड्रोनच्या वापरावर बंदी; अलर्ट जारी!
GET IN! 🦁🦁🦁
To the #T20WorldCup final…
WE'RE ON OUR WAY! 🙌 pic.twitter.com/z1sQ6EmioP
— England Cricket (@englandcricket) November 10, 2022
दोन्ही संघांची Playing 11 –
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
इंग्लंड : जोस बटलर (यष्टीरक्षक/कप्तान ), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.