IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी ‘जब्बर’ धक्का..! ‘मोठा’ खेळाडू खेळू शकणार नाही मॅच

WhatsApp Group

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना १० नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माची टीम इंडिया ग्रुप-२ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थानावर होती. त्याचवेळी, जोस बटलरच्या इंग्लिश संघाने सुपर-१२ फेरीनंतर ग्रुप-१ मध्ये दुसरे स्थान पटकावले. पण, उपांत्य फेरीपूर्वीच इंग्लंड संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. संघाचा दमदार फलंदाज डेव्हिड मलान भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. खुद्द संघाचा अष्टपैलू मोईन अलीने याला दुजोरा दिला आहे.

शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३५ वर्षीय मालनला दुखापत झाली होती. या कारणास्तव तो मैदान सोडून बाहेर गेला. नंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या जागी फिल सॉल्टला संधी दिली जाऊ शकते. सॉल्टने इंग्लंडसाठी ११ टी-२० सामने खेळले आहेत आणि टी-२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८८ धावा केल्या होत्या. जी त्याची टी-२० मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – Abdul Sattar : अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंना ‘शिवी’! अमोल कोल्हे म्हणाले, “नीच…”

इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अली मलानच्या दुखापतीबद्दल म्हणाला, “तो (डेव्हिड मलान) अनेक वर्षांपासून आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. मला माहीत नाही, पण खरे सांगायचे तर त्याची दुखापत बरी नाही. आम्ही इथे (अ‍ॅडलेड) पोहोचलो तेव्हा तो स्कॅनसाठी गेला होता. आम्हाला त्याबद्दल फारशी माहिती नाही. पण, त्याची दुखापतीची प्रकृती चांगली दिसत नाही.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment