T20 World Cup 2022 IND vs BAN : सलामीवीर केएल राहुलने बांगलादेशविरुद्ध आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर १२ सामन्यात ३२ चेंडूत ५० धावा करून आपल्या खराब फॉर्मचा अंत केला. राहुलची सुरुवात संथ झाली, पण जसजसा तो पुढे खेळत गेला तसतसा त्याला रोखणे बांगलादेशच्या गोलंदाजांसाठी कठीण होत गेले. क्रिझवर असलेल्या आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान राहुलने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. यादरम्यान त्याचे काही शॉट्स अगदी धक्कादायक होते. दरम्यान, राहुलने इतका जबरदस्त षटकार ठोकला की नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या विराट कोहलीचे तोंडही उघडेच राहिले.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी केएल राहुल २०२२ च्या टी२० विश्वचषकात बॅटने फार काही करू शकला नाही. शरीफुल इस्लामविरुद्धच्या सामन्याच्या 9व्या षटकात राहुलने 3 चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत १६ धावा काढल्या. मात्र, पुढच्याच षटकात राहुलला शाकिब अल हसनने बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
ON LOOOOOP! 🥳 #INDvBAN
You makes us happy, KL Rahul! ❤️pic.twitter.com/y6nCfgU2zV
— Kunal Yadav (@kunaalyaadav) November 2, 2022
हेही वाचा – चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन..! जगातील सर्वात मोठ्या IPhone फॅक्टरीजवळ कोरोनाचा उद्रेक
Bro this is the man who celebrate every moment of match. whether which is of him or the whole team.because the enery level of kohli in the feild is fanstastic and enjoy every moment .wheather it is catch,or wicket or six or any other moment#kohli #ViratKohli𓃵 #KLRahul pic.twitter.com/pVI51YCzL6
— Vikash Tyagi (@Vikashbeing123) November 2, 2022
दोन्ही संघांची Playing 11
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन (कप्तान), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शॉरीफुल इस्लाम, नुरुल हसन (यष्टीरक्षक), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.