T20 World Cup 2022 IND vs BAN Ravichandran Ashwin Six : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये बुधवारी भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले. या सामन्यात बांगलादेशचा कप्तान शाकिब अल हसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फॉर्मात परतलेल्या केएल राहुल आणि विराट कोहली यांचे अर्धशतक टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येकडे घेऊन गेले. भारताने २० षटकात ६ बाद १८४ धावा केल्या. राहुलने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५० तर विराटने ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६४ धावा केल्या. शेवटच्या षटकात भारताने १४ धावा केल्या. यात रवीचंद्रन अश्विनच्या एक दिमाखदार षटकाराचा समावेश होता.
अश्विनचा जबरदस्त षटकार
बांगलादेशकडून शोरीफुल इस्लामने षटक टाकले. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अश्विनने पूल शॉट खेळत षटकार ठोकला. अश्विनचा हा षटकार पाहून विराटही थक्क झाला. त्याची रिअॅक्शनही चर्चेत ठरली. पुढच्या चेंडूवर अश्विनने चौकार ठोकला. या सामन्यात अश्विनने नाबाद १३ धावा केल्या.
टी-२० वर्ल्डकपमध्ये रवी अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ठोकला जबरदस्त षटकार!#INDvsBAN #Ashwin #T20worldcup22 @vachamarathi pic.twitter.com/tez9qkD0N6
— Vacha Marathi (@VachaMarathi) November 2, 2022
Ashwin Anna can do it himself. Another handy contribution from him with the bat. pic.twitter.com/kquq4hT1nI
— Rahul Sharma (@CricFnatic) November 2, 2022
What a six by Ashwin Anna
Ashwin, you beauty#INDvsBangladesh #T20WorldCup pic.twitter.com/R2LRvPxqb9
— Cric (@Lavdeep19860429) November 2, 2022
Ashwin Anna ✊ pic.twitter.com/zX8qfqHQ62
— prime video IN (@PrimeVideoIN) November 2, 2022
दोन्ही संघांची Playing 11
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन (कप्तान), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शॉरीफुल इस्लाम, नुरुल हसन (यष्टीरक्षक), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.