T20 World Cup 2022 IND vs AUS Warm-Up Match : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर (IND vs AUS) ६ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. टीम इंडियाने ठेवलेल्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांना २० षटकांत केवळ १८० धावाच करता आल्या. धोकादायक दिसणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचला बाद करत हर्षल पटेलने यजमानांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. पण या मॅचचा खरा हिरो ठरला मोहम्मद शमी. शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. पण शमीच्या या षटकात ऑस्ट्रेलियाने ४ फलंदाजांना गमावले. ऑस्ट्रेलियाला चारच धावा घेता आल्या.
ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात कर्णधार फिंचने ७६ धावांची धडाकेबाज खेळी खेळली, त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार खेचले. फिंचशिवाय मिचेल मार्शने ३५, ग्लेन मॅक्सवेलने २३ धावा केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने २, अर्शदीप-हर्षल आणि चहलला १-१ विकेट मिळाली. तर मोहम्मद शमीने शेवटच्या ओव्हरमध्ये ३ विकेट घेतल्या.
Mohammed Shami bowled a world class 20th over. Just brilliant how accurate he was with his bowling, great signs for India ahead of the group matches.
2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs.#INDvsAUS #Shami pic.twitter.com/IoZcOuwOQ2
— Syed Aamir Quadri (@aamir28_) October 17, 2022
हेही वाचा – Grampanchayat Election : मनसेनं उघडलं खातं..! ‘या’ ठिकाणी मारलं मैदान; ९ पैकी ६ सदस्य विजयी
2, 2, W, W, W, W
Mohammed Shami has announced his arrival with an impressive last over to guide India to a nervy win 🔥#MohammedShami #INDvsAUS #T20WorldCup pic.twitter.com/UBJHIwAv0V
— Wisden India (@WisdenIndia) October 17, 2022
तत्पूर्वी केएल राहुल (५७) आणि सूर्यकुमार यादव (५०) यांनी भारताकडून शानदार खेळी खेळली. २० षटकात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ गडी गमावून १८६ धावा केल्या. राहुल आणि सूर्यकुमारशिवाय भारताकडून रोहित शर्माने १५, विराट कोहलीने १९, दिनेश कार्तिकने २० धावा केल्या.
मोहम्मद शमीचे २०वे षटक :
- पहिला चेंडू – २ धावा
- दुसरा चेंडू – २ धावा
- तिसरा चेंडू – पॅट कमिन्स बाद
- चौथा चेंडू – अॅश्टन असगर धावबाद
- पाचवा चेंडू – जोश इंग्लिस बाद
- सहावा चेंडू – केन रिचर्डसन बाद