T20 World Cup 2022 : थोडक्यात बचावला सूर्यकुमार यादव..! जीवघेण्या बाऊन्सरनं हेल्मेट तुटलं; पाहा Video

WhatsApp Group

T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादव सध्या टी-२० मध्ये भारताचा नंबर एक फलंदाज आहे. सोमवारी झालेल्या सराव सामन्यात (IND vs AUS) त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी एक शानदार खेळी खेळली. त्याने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. यापूर्वी त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धही अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ १८० धावा करून सर्वबाद झाला. अशाप्रकारे सराव सामना ६ धावांनी जिंकून टीम इंडियाने आपली तयारी आणखी मजबूत केली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने फक्त एक षटक टाकले आणि ३ बळी घेतले.

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क १९वे षटक टाकत होता. पाचव्या चेंडूने त्याने शॉर्ट टाकला. सूर्यकुमार यादवने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही. चेंडू सरळ जाऊन त्याच्या हेल्मेटला लागला. यामुळे त्याचा पुढचा भाग तुटला. मात्र सुदैवाने सूर्यकुमारला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.यानंतर स्टार्कनेही सूर्यकुमारकडे जाऊन त्याची प्रकृती जाणून घेतली.

हेही वाचा – Drishyam 2 Trailer : ७ वर्षांपूर्वीची केस पुन्हा बाहेर येणार..! ‘दृश्यम २’ चा खिळवून ठेवणारा ट्रेलर रिलीज

कोण किती खेळलं?

टीम इंडियासाठी केएल राहुलने सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ५७ धावा केल्या. रोहित शर्माने १५, विराट कोहलीने १९ आणि दिनेश कार्तिकने २० धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ३० धावा देत ४ बळी घेतले. मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅश्टन अगर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार आरोन फिंचने ७६ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. मिचेल मार्शने ३५ आणि ग्लेन मॅक्सवेलने २३ धावा केल्या. मोहम्मद शमीने एका षटकात ४ धावा देऊन ३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. टीम इंडिया १९ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे.

Leave a comment