T20 World Cup 2022 : जगात 360 डिग्री एकच..! सूर्यानं असं म्हटल्यावर डिव्हिलियर्सनं दिला रिप्लाय; म्हणाला…

WhatsApp Group

T20 World Cup 2022 AB de Villiers On Suryakumar Yadav : झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर-१२च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही असे वाटत असतानाच सूर्यकुमार यादव ट्रबलशूटरच्या रूपात आला आणि त्याने २५ चेंडूत ६१ धावांची झटपट खेळी केली. संघाची धावसंख्या १८६ पर्यंत पोहोचली. दिली. त्यामुळे या मोठ्या धावसंख्येच्या दडपणाखाली झिम्बाब्वेचा संघ पुर्णपणे विस्कळीत झाला आणि अवघ्या १७.२ षटकात ११५ धावांवर सर्वबाद झाला.

टीम इंडियाने हा सामना ७१ धावांनी जिंकला याला टी-२० मधील मोठा विजय म्हणता येईल. या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव, ज्याने मैदानात चौफेर फटकेबाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने एका कॅलेंडर वर्षात १००० धावा करण्याचा विक्रमही केला.

हेही वाचा – Horoscope Today : कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

डिव्हिलियर्सच्या तुलनेत सूर्या काय म्हणाला?

सामन्यानंतर, जेव्हा त्याची तुलना 360 डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सशी केली गेली तेव्हा त्याने सांगितले की जगात 360 डिग्री एकच आहे आणि तो त्याच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, नंतर एबी डिव्हिलियर्सनेही सूर्याची फलंदाजी आणि त्याची स्वतःशी केलेली तुलना यावर आपली प्रतिक्रिया दिली. डिव्हिलियर्सने ट्वीट केले, ”तू त्या दिशेने वेगाने जात आहेस आणि माझ्या पुढे जा. आज खूप छान खेळलास.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment