न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवल्यानंतर सूर्यकुमार यादवला मिळाली गूड न्यूज..!

WhatsApp Group

Suryakumar Yadav T20 Ranking : सूर्यकुमार यादवचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. टी-२० विश्वचषकात दमदार फलंदाजी केल्यानंतर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भन्ना़ट फलंदाजी केली. तीन टी-२० मालिकेत तो फक्त एकदाच बाद झाला आणि त्याने सर्वाधिक १२४ धावा केल्या. या मालिकेतील दुसऱ्या टी-२०मध्ये सूर्यकुमारने नाबाद १११ धावांची खेळी केली. या खेळीनंतरच ३२ वर्षीय भारतीय फलंदाजाने ८९५ रेटिंग पॉइंट्स गाठले, जे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. मात्र, तिसऱ्या टी-२० मध्ये १३ धावा करून सूर्यकुमार बाद झाला. त्यामुळे त्याचे रेटिंग ८९० अंकांवर आले होते. असे असूनही, तो दुसऱ्या क्रमांकावरील पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानपेक्षा ५४ रेटिंग गुणांनी पुढे आहे.

त्याचवेळी तिसऱ्या स्थानावर असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला ताज्या टी-२० क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. तिसर्‍या क्रमांकावरून तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कॉनवेचे ७८८ रेटिंग गुण आहेत. कॉनवेने भारताविरुद्धच्या ३ टी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली. त्याने २ सामन्यात एकूण ८४ धावा केल्या.

हेही वाचा – दिग्गज क्रिकेटर युवराज सिंगला होणार शिक्षा..! गोव्यात केलंय ‘असं’ काम; वाचा!

सूर्यकुमार यादवशिवाय, फलंदाजांच्या टी-२० क्रमवारीत एकाही भारतीयाचा टॉप-१० मध्ये समावेश नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाचा भाग नसलेल्या विराट कोहलीला दोन स्थानांचा पराभव झाला आहे. तो आता १३व्या क्रमांकावर घसरला आहे. केएल राहुल १९व्या तर रोहित शर्मा २१व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलामी देणाऱ्या इशान किशनला ताज्या क्रमवारीत १० स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता ३३व्या स्थानावर आला आहे.

Leave a comment