ग्रेट..! आता सुरेश रैनाला म्हटलं जाणार ‘डॉक्टर’ सुरैश रैना; वाचा झालंय काय!

WhatsApp Group

मुंबई : भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये सुरेश रैनाची गणना केली जाते. त्यानं टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. असंख्य शानदार खेळी खेळल्या. एक काळ असा होता की तो भारतीय संघाच्या मधल्या फळीचा जीव होता. युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या त्रिकुटामुळंच भारत लक्ष्य गाठण्यात पारंगत मानला जाऊ लागला. त्यानं आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक विक्रमही केले आहेत. ‘चिन्ना थाला’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाच्या मुकुटात आता आणखी एक रत्न जोडलं गेलं आहे.

सुरेश रैनाला डॉक्टरेट!

खरंतर सुरेश रैना आता फक्त सुरेश रैना राहिला नसून तो डॉक्टर सुरेश रैना बनला आहे. मिस्टर आयपीएल रैनाला वेल्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. ३५ वर्षीय रैनानं या कार्यक्रमाचे काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. ”प्रतिष्ठित वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड अॅडव्हान्स्ड स्टडीज यांच्याकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल मला नम्र वाटत आहे. मी सर्वांच्या प्रेमानं प्रभावित झालो आहे आणि मनापासून धन्यवाद. चेन्नई हे घर आहे आणि त्यात माझ्यासाठी एक खास जागा आहे”, असं रैनानं सांगितलं.

हेही वाचा – आता खायला मिळणार ‘सुष्मिता आंबा’ आणि ‘अमित शाह आंबा’..! नेमकी भानगड काय? वाचा!

कॉमेंट्री करतो रैना!

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय असलेला सुरेश रैना गेल्या काही वर्षांपासून जास्त अॅक्टिव्ह नव्हता. यामुळंच गेल्या वर्षी आयपीएलच्या एकाही संघानं त्याला लिलावात विकत घेतलं नाही. एखादा खेळाडू दुखापत झाल्यास किंवा अनुपलब्ध झाल्यास बदली म्हणून रैनाला बोलावलं जाईल, असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. २०२२ मध्ये त्यानं कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली.

रैनाची कारकीर्द

२००५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सुरेश रैनानं २०१८ मध्ये भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारतासाठी, त्यानं १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळले. या दरम्यान, त्यानं १८ कसोटी सामन्यांमध्ये ७६८ धावा, २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५६१५ धावा आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये १६०४ धावा केल्या. रैनानं तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ७ शतकं आणि ४८ अर्धशतकं केली आहेत. मजबूत फलंदाज असण्यासोबतच तो चांगला गोलंदाजही होता. रैनानं कसोटीत १३, एकदिवसीय सामन्यात ३६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १३ बळी घेतले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment