IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद जिंकणार यंदाची आयपीएल? पॅट कमिन्सला बनवलं कॅप्टन

WhatsApp Group

Sunrisers Hyderabad Skipper Pat Cummins | इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. आगामी हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे नेतृत्व करेल. फ्रेंचायझीने कमिन्सची पुढील हंगामासाठी कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने ट्वीट करून याला अधिकृत दुजोरा दिला आहे. सनरायझर्स हैदराबादने ट्वीट केले की, ‘ऑरेंज आर्मी. आयपीएल 2024 साठी पॅट कमिन्स आमचा नवा कर्णधार आहे. कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामची जागा घेतली आहे. कमिन्स हा सनरायझर्स हैदराबादचा 10वा कर्णधार असेल.”

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 च्या लिलावात पॅट कमिन्सला 20.5 कोटी रुपयांना विकत घेतले. कर्णधार म्हणून कमिन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली, ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये दोन आयसीसी विजेतेपदे (WTC अंतिम आणि क्रिकेट विश्वचषक) जिंकली. हे दोन्ही विजेतेपद ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून जिंकले होते. पॅट कमिन्सने 2023 मध्ये एकूण 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 422 धावा केल्या आणि 59 विकेट घेतल्या.

हेही वाचा – Petrol Diesel Rate Today ( 04 March 2024) : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील नवीन किमती

आयपीएल 2023 मध्ये एडन मार्करामने सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले होते, तेव्हा हैदराबाद संघाची कामगिरी काही खास नव्हती. मार्करामने 13 सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले, ज्यामध्ये संघाने केवळ चार सामने जिंकले. आता काव्या मारन यांच्या संघाने कमिन्सवर विश्वास व्यक्त केला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment