

Sunil Gavaskar Warning To Sourav Ganguly : सुनील गावसकर आणि सौरव गांगुली हे दोघेही भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहेत. हे दोन्ही खेळाडू फुटबॉलप्रेमीही आहेत. अलीकडेच माजी महान फलंदाज सुनील गावसकर फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी कतारला पोहोचले होते. तेथे तो सर्वकाळातील महान फुटबॉल व्यवस्थापक आर्सेन वेंगरला भेटला. आर्सेनने आपल्या २२ वर्षांच्या कार्यकाळात आर्सेनलला ३ खिताब मिळवून दिले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर सुनील गावसकर सोनी स्पोर्ट्सवर आले. यावेळी त्यांनी थियरी हेन्रीमुळे आर्सेनलचा चाहता असल्याचे सांगितले. थिएरी हेन्री हे फ्रान्सचे फुटबॉल प्रशिक्षक आहेत. गावसकर यांनी सांगितले की, त्यांना आर्सेनल आणि फ्रेंच दिग्गज थियरी यांची स्वाक्षरी केलेली जर्सी मिळवण्यात यश आले आहे. ते पुढे म्हणाले, की ही जर्सी सौरवकडे आहे. गावसकरांनी मजेशीर मूडमध्ये गांगुलीला धमकी दिली आणि सांगितले की, मी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडेसाठी कोलकात्यात येत आहे, तेव्हा मला ती जर्सी हवी आहे.
हेही वाचा – PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना बसणार झटका, १३व्या हप्त्याचे २००० रुपये हातातून जाणार!
गावसकर म्हणाले, ”सौरव गांगुली नमस्कार! तो टी-शर्ट कुठे आहे? मी १२ तारखेला कोलकात्यात येत आहे. तुला माहीत आहे मला निमित्ताची गरज नाही. तू आता बीसीसीआयचा अध्यक्ष नाहीस. तुझ्याकडे वेळ आहे. मला १२ तारखेला टी-शर्ट दे.”
Sunil Gavaskar has a special request to Sourav Ganguly.pic.twitter.com/bTzv0LH9lV
— KnightRidersXtra (@KRxtra) December 22, 2022
गावसकर पुढे त्यांच्या मुलाचा संदर्भ देत म्हणाले, ”मी फॅन नाही, मी आर्सेनलचा फॉलोअर आहे. मला माझ्या मुलाला चिडवायचे की तू मँचेस्टर युनायटेडचा चाहता आहेस आणि मी आर्सेनलचा आहे. तो मला सांगायचा. आर्सेनलच्या चार खेळाडूंची नावे सांगा आणि मी म्हणायचो, ‘थियरी, हेन्री, डेनिस, बर्गकॅम्प.”