Sunil Gavaskar On Team India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बरीच टीका झाली होती. माजी भारतीय क्रिकेटपटूंसह परदेशी क्रिकेटपटूही भारताच्या निराशाजनक कामगिरीवर निशाणा साधत आहेत. या टीकेदरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा रागही भारतीय संघावर उफाळून आला आहे.
भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे भारताला 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. गावसकर म्हणतात की भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकू शकतो, पण पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या सामन्यात समोर असेल आणि त्यामुळे भारताने आपल्या चुका सुधारल्या पाहिजेत आणि केवळ वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध जिंकून काही फरक पडत नाही.”
गावसकर म्हणाले, “मी अशा संघांमध्ये होतो जिथे आम्हाला वयाच्या 42 व्या वर्षी वगळण्यात आले होते आणि आम्ही चेंजिंग रूममध्ये दुःखी होतो. आमच्यावर खूप टीकाही झाली होती. त्यामुळे मला वाटते की तुम्ही असे म्हणू शकत नाही की सध्याची परिस्थिती टीकेच्या पलीकडे नाही. काय झाले, ते कसे आऊट झाले, त्यांनी चांगली गोलंदाजी का केली नाही, त्यांनी झेल का घेतले नाहीत, प्लेइंग इलेव्हन योग्य आहे का, या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात.”
हेही वाचा – उडणारं हॉटेल! आता आकाशातही करा पार्टी, एका तासाचं बिल 11 लाख!
गावस्कर पुढे म्हणाले की, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाविरुद्ध जेतेपदाच्या सामन्यांमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती केली तर वेस्ट इंडिजसारख्या संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकून काही फायदा होणार नाही.
“आपण आता वेस्ट इंडिजला जात आहोत, आपण त्यांना 2-0 किंवा 3-0 ने हरवू, याचा अर्थ तुम्ही ग्रेट टीम असा नाही. मोठ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध काय झाले ते सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही फायनलला गेलात आणि तुम्ही पुन्हा ऑस्ट्रेलियाशी खेळत असाल, त्याच चुका करत असाल तर तुम्ही ट्रॉफी कशी जिंकणार आहात?”, असेही गावसकर म्हणाले.
Sunil Gavaskar said:
"West Indies are a weaker team. You go and beat them 3-0, 4-0, doesn't mean you are a great team."#TeamIndia #WTC pic.twitter.com/dbVpCtW5fQ
— 12th Khiladi (@12th_khiladi) June 11, 2023
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!