Sunil Gavaskar : आशिया कप 2023 या स्पर्धेसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा या प्रतिष्ठित स्पर्धेच्या 16व्या हंगामात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. अनेक खेळाडूंना संघात आश्चर्यकारक स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असलेल्या काही खेळाडूंची निराशा झाली आहे.
भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर टीम इंडियाचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्याशी याबाबत चर्चा झाली असता, त्यांनी निर्भयपणे उत्तर दिले आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
एका मीडिया संस्थेच्या टीव्ही चॅनेलवर जेव्हा अँकरने गावसकरांना रवीचंद्रन अश्विनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते थोडे भडकले. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा संघ निवडला जातो, तेव्हा अशा गोष्टी घडू लागतात. त्याला का निवडले, ह्याला का नाही? असे वाद राहतात. जर एखाद्याला निवडलेला संघ आवडत नसेल तर त्याने सामना पाहू नये. हा देशाचा संघ आहे, सर्वांचा संघ आहे. त्याची निवड का झाली नाही, ह्याची निवड का झाली, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.
हेही वाचा – रजनीकांत यांचा खुलासा! योगी आदित्यनाथंच्या पायांना स्पर्श करण्याचे कारण…
ते म्हणाले, ”हो, असे अनेक खेळाडू होते ज्यांना संघात संधी मिळू शकली असती. ते थोडे दुर्दैवी ठरले, परंतु ही टीम आता झाली आहे. आता अश्विन-वश्विनबद्दल बोलू नका… ते कुणीही असोत. ज्या संघाची निवड झाली आहे, त्याला पाठीशी घालायचे आहे. त्याची निवड का झाली नाही, ह्याची निवड का झाली, ही आपली चुकीची विचारसरणी आहे. हा वाद आपण नेहमी कुठे ना कुठे करत असतो. जो संघ निवडला गेला आहे तो योग्य आहे. जर तुम्हाला तो आवडत नसेल तर सामना पाहू नका. ही प्रत्येकाची टीम आहे. हा भारतीय संघ आहे.”
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!