टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी गेलेल्या श्रीलंकेच्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! ‘हे’ आहे कारण

WhatsApp Group

Sri Lankan cricketer Danushka Gunathilaka Arrested : खेळाला लाजवेल अशी बातमी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातून समोर येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलका याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्यामुळे सिडनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) च्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एका महिलेने दानुष्कावर बलात्काराचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीवरून ३१ वर्षीय दानुष्काला सिडनीमध्ये अटक करण्यात आली.

श्रीलंकेचा संघ २०२२ च्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये पोहोचला होता. त्यांनी शनिवारी (५ नोव्हेंबर) इंग्लंडविरुद्ध गट-१ मध्ये शेवटचा सामना खेळला. या सामन्यादरम्यान दानुष्का संघासोबत होता. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला. या सामन्यानंतर दानुष्काला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही  वाचा – T20 World Cup 2022 : गतविजेता ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपबाहेर..! ‘हे’ दोन संघ सेमीफायलनमध्ये

यावेळी श्रीलंकेचा संघ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. यामुळे संघ आता त्यांच्या देशात परतला आहे. पण दानुष्का संघासोबत घरी जाऊ शकला नाही, कारण त्याला अटक झाली. वास्तविक, दानुष्का श्रीलंकेच्या टीमसोबत वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला. मात्र दुखापतीमुळे तो मध्येच स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर त्याच्या जागी अशेन बंडाराला संघात स्थान देण्यात आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment