VIDEO : अँजेलो मॅथ्यूजने पायावर कुऱ्हाड नव्हे, तर कुऱ्हाडीवर पाय मारला!

WhatsApp Group

या आठवड्यात कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक मोठी कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम, भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले. यानंतर न्यूझीलंडचा युवा सेन्सेशन रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावले. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज अँजेलो मॅथ्यूजचेही (Angelo Mathews Out On Wide Ball) नाव येऊ शकले असते, पण वाईड बॉलवर फटका खेळण्याच्या लोभापायी त्याने आपली विकेट गमावली.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात श्रीलंकेने 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विश्व फर्नांडो, असिता फर्नांडो आणि प्रभात जयसूर्या या त्रिकुटासमोर अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात केवळ 198 धावाच करू शकला. रहमत शाहने एकाकी झुंज देत 91 धावांची खेळी केली.

पहिल्या डावात अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजची 141 धावांची खेळी आणि दिनेश चंडीमलच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने 439 धावांची मोठी मजल मारली. पहिल्या डावाच्या जोरावर संघाला अफगाणिस्तानविरुद्ध 241 धावांची मोठी आघाडी मिळाली. अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या डावात 296 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर केवळ 56 धावांचे लक्ष्य ठेवले, जे संघाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

हेही वाचा – मंत्रिमंडळ निर्णय : मुंबईतील करदात्यांना सवलत, शेतकऱ्यांना बांबू लागवड अनुदान…

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील एकमेव कसोटी सामना 5 फेब्रुवारी रोजी संपला, परंतु या सामन्यादरम्यान मॅथ्यूज आऊट झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 141 धावा केल्यानंतर अँजेलो मॅथ्यूज ज्या प्रकारे बाद झाला ते खूपच निराशाजनक होते. त्याने काईस अहमदच्या एक वाइड बॉलवर फटका खेळला, तो सीमापार गेला पण यात त्याची बॅट स्टम्पवर जाऊन आदळली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment