टी-20 मालिकेत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर श्रीलंका संघाचा ‘मोठा’ निर्णय!

WhatsApp Group

IND vs SL ODI : श्रीलंकेच्या निवड समितीने भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. टी-20 नंतर श्रीलंकेने आता वनडेमध्येही कर्णधार बदलला आहे. एकदिवसीय मालिकेचेही नेतृत्व चरिथ असलंका करणार आहे. कुशल मेंडिसच्या जागी त्याला नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी असलंकाला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर वानिंदू हसरंगाने टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी असलंकाला कमांड मिळाली. याच निवडकर्त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेंडिसला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले होते. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याने अनेक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. असे असतानाही त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.

हेही वाचा –ITR Filing Deadline : रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस, चुकला तर मुकला, 1000-5000 रुपयांचा दंड!

मेंडिसच्या नेतृत्वाखाली, श्रीलंकेने अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्ध सलग पाच मायदेशी सामने जिंकले, परंतु बांगलादेशविरुद्ध 2-1 असा पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेला 2, 4 आणि 7 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. असलंकाच्या नेतृत्वाखाली संघाने एकदिवसीय मालिका गमावली आहे. आता मेंडिसच्या जागी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणे योग्य ठरेल का, हे पाहायचे आहे.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ

चारिथ असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सादरा समराविक्रम, कामिंदु मेंडिस, जनित लिंयांगे, निशान मधुश्का, वानिंदु हसेरंगा, डुनिथ वेल्लालागे, चामिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मधुशंका, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment