दक्षिण आफ्रिकेला धक्का, 32 वर्षीय हेनरिक क्लासेनची अचानक निवृत्ती!

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 32 वर्षीय क्लासेन (Heinrich Klaasen Test Cricket Retirement) आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे. क्लासेनने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 101 सामने खेळले आहेत. अलीकडेच त्याने भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध 61 चेंडूत शतक झळकावले होते.

हेनरिक क्लासेनने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 54 एकदिवसीय, 43 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळले आहेत. त्याची कामगिरी कसोटी क्रिकेटपेक्षा एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली आहे. 2019 ते 2023 दरम्यान झालेल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये क्लासेनला केवळ 104 धावा करता आल्या. त्याची कसोटी फॉर्मेटमधील सर्वोच्च धावसंख्या 35 धावा होती. तर वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 4 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत. त्‍याच्‍या नावावर टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यात 4 अर्धशतके आहेत.

हेही वाचा – जेव्हा समुद्रात झाली होती मंत्रिमंडळाची बैठक, तब्बल 30 मिनिटं सरकार पाण्यात!

”गेल्या काही दिवसांपासून मी योग्य निर्णय घेत आहे की नाही असा प्रश्न मला पडत होता. ह्याच विचारात मी अनेक रात्री जागे राहून घालवल्या. हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता कारण तो माझा आवडता फॉरमॅट होता”, असे क्लासेनने म्हटले. क्लासेनने आयपीएलसारख्या टी-20 लीगवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटला अलविदा केल्याचे मानले जाते.

हेनरिक क्लासेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. हैदराबाद फ्रेंचायझीने क्लासेनला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. हैदराबादने क्लासेनला 2024 साठीही आपल्या संघात कायम ठेवले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment