IPL 2023 : पुन्हा दादागिरी..! सौरव गांगुली करणार कमबॅक; ‘या’ टीमचा होणार सदस्य!

WhatsApp Group

Sourav Ganguly In IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक म्हणून परतणार आहेत. आयपीएलच्या सूत्राने सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्याची माहिती दिली आहे. आयपीएलच्या सूत्रांचा हवाला देऊन, वृत्तसंस्था पीटीआयने म्हटले आहे की सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीसाठी क्रिकेट संचालक म्हणून नियुक्त होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी गांगुली आयपीएल २०१९ मध्ये सल्लागार म्हणून फ्रेंचायझीचा भाग होता.

गांगुलीने ऑक्टोबर २०२२ मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गांगुली आंतरराष्ट्रीय टी-२० लीगमधील दुबई कॅपिटल्स आणि दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमधील प्रिटोरिया कॅपिटल्ससह फ्रेंचायझीच्या सर्व क्रिकेट वर्टिकलवर देखरेख करेल. आयपीएलच्या सूत्राने सांगितले की, “होय… सौरव या वर्षापासून दिल्ली कॅपिटल्ससोबत पुनरागमन करेल. फ्रेंचायझी आणि त्याच्यात याबाबत चर्चा झाली आहे.”

हेही वाचा – Maharashtra Corruption : महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्टाचारी विभाग कोणता? समोर आली यादी!

आयपीएलच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “गांगुलीने फ्रेंचायझीसोबत काम केले आहे. जर त्याने आयपीएलमध्ये काम केले असते तर ते नेहमीच दिल्ली कॅपिटल्ससोबत असते.” गांगुली २०१९ मध्ये फ्रेंचायझीसोबत असताना दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता. नुकत्याच झालेल्या लिलावात मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि गांगुली या दोघांच्याही सूचनेचे फ्रेंचायझीने पालन केल्याचे समजते.

दिल्ली कॅपिटल्सने गेल्या डिसेंबरमध्ये आयपीएल लिलावात पाच खेळाडूंना खरेदी केले होते, मुकेश कुमार हा त्यांचा सर्वात महागडा खेळाडू होता. फिल सॉल्ट, रायली रुसो आणि मनीष पांडे यांच्यासह दिल्लीने आपली फलंदाजी मजबूत केली आहे.

दिल्ली कॅपिटल्सची संपूर्ण टीम :

ऋषभ पंत (कप्तान), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सर्फराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, एनरिक नोर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी अँगिडी, मुस्तफिजुर रहमान , अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे, रायली रुसो.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment