Sourav Ganguly On IPL : सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वैर सर्वांनाचा माहीत आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. मात्र, पुढच्या सामन्यात ते एकत्र दिसले.
आता एका मुलाखतीत सौरव गांगुलीने विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, आयपीएल जिंकणे विराटसाठी सोपे नाही. मात्र, तो चुकून असे बोलला. या मागची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया. सौरव गांगुली विक्रांत गुप्ताला मुलाखत देताना हा प्रकार घडला.
यादरम्यान सौरव म्हणत होता, “माझा रोहित शर्मावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आणि महेंद्रसिंह धोनीने 5 वेळा आयपीएल जिंकले आहे. त्यामुळे आयपीएल जिंकणे इतके सोपे नाही विराट..विक्रांत.” गांगुलीच्या या वाक्याने खळबळ उडाली आहे. खरंतर, त्याला विक्रांत म्हणायचं होतं, पण चुकून त्याच्या तोंडून विराट बाहेर पडलं.
Sourav Ganguly is a simple person. Jo dil me hota hai, vohi muh pe pic.twitter.com/lk38NMFhE8
— Rajabets India🇮🇳👑 (@smileandraja) June 17, 2023
हेही वाचा – ‘आदिपुरुष’मध्ये होणार मोठा बदल, दिग्दर्शक-निर्मात्यांनी घेतला निर्णय!
2021 पासून सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात मतभेद होते. जेव्हा विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष होते. विराटला कर्णधारपद सोडण्यासही नकार दिल्याचे त्याने सांगितले.
आयपीएल 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फायनल जिंकता आलेली नाही. तो 3 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे आणि पराभूत झाला आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने अंतिम फेरीत त्यांचा पराभव केला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!