Sourav Ganguly : 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) सुरू होणार आहे. त्यासाठी संपूर्ण वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा हा 13वा हंगाम असेल. ज्यासाठी माजी भारतीय क्रिकेटर सौरव गांगुलीनेही 4 सेमीफायनल स्पर्धकांची नावे दिली आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोणता संघ पोहोचू शकतो हे त्याने एका मुलाखतीत सांगितले. विशेष म्हणजे त्याने तीनदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघाला बाहेर फेकले आहे.
सौरव गांगुली RevSports शी बोलताना म्हणाला, “कोणते 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील हे सांगणे कठीण आहे. पण मला वाटते की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत हे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. आपण न्यूझीलंडला हलक्यात घेऊ शकत नाही. यासोबतच मी पाकिस्तानची निवड करेन कारण पाकिस्तानचा दर्जा चांगला आहे. भारत-पाकिस्तान उपांत्य फेरीचा सामना ईडन गार्डन स्टेडियमवर पाहायला मिळेल, अशी मला आशा होती.”
Sourav Ganguly predicts India, Pakistan, England and Australia is going to play Semifinal in World Cup 2023
.
.
.#souravganguly #ganguly #semifinalist #worldcup2023 #worldcup #CWC2023 #Cricketgyan pic.twitter.com/7csNnN3Wdh— Cricket Gyan (@cricketgyann) July 8, 2023
हेही वाचा – Toyota आणतेय परवडणारी 7-सीटर फॅमिली कार! कधी येणार, किंमत किती? वाचा!
गांगुली पुढे म्हणाला, “मला खूप आनंद आहे की ईडन गार्डन स्टेडियमवर एकूण 5 सामने होतील. उपांत्य फेरीचे सामनेही याच स्टेडियममध्ये होणार आहेत. यासाठी मी बीसीसीआय आणि जय शाह यांचा खूप आभारी आहे. ईडन गार्डन हे सर्वात मोठे ठिकाण आहे जिथे 60 ते 70000 लोक बसू शकतील. येत्या 2 वर्षात आम्ही येथे 1 लाख लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करू.”
चार संघांची निवड करून गांगुलीने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आजपर्यंत एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ 3 वेळा फायनलमध्ये पोहोचला आहे आणि एकदा चॅम्पियन बनला आहे. 2007 आणि 2011 मध्ये तो फायनलमध्ये पराभूत झाला होता. तर 1996 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!