

Sourav Ganguly After BCCI Exit :भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पदावरून पायउतार झाल्यानंतर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. मंडळावरील कोणत्याही पदावर कोणतीही व्यक्ती कायम नसते, असे सांगून त्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर, गांगुलीला दुसरी टर्म हवी असतानाही त्याला पायउतार होण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले. सौरव गांगुलीला बीसीसीआयमध्ये कोणताही पाठिंबा मिळाला नाही आणि त्याचा कार्यकाळ ‘निराशाजनक’ पातळीवर संपला आहे. त्यानंतर बंगालच्या राजकारणात भूकंप झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीच्या अनेक नेत्यांनी दादांच्या हकालपट्टीसाठी भाजपला दोष दिला होता, तर भाजपने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळला होता.
गांगुली म्हणाला…
एएनआयच्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमात गांगुली म्हणाला, ”मी पाच वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष होतो. मी अनेक वर्षांपासून बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. आता मला नवीन गोष्टीकडे वळायचे आहे. तुम्ही एका दिवसात अंबानी किंवा नरेंद्र मोदी बनत नाही, त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि समर्पण लागते. प्रशासक म्हणून तुम्हाला संघासाठी खूप योगदान द्यावे लागेल आणि गोष्टी अधिक चांगल्या कराव्या लागतील. एक खेळाडू म्हणून मला ते समजले. प्रशासक म्हणून मी माझ्या वेळेचा पुरेपूर आनंद लुटला. तुम्ही नेहमी संघात खेळू शकत नाही किंवा प्रशासनात राहू शकत नाही.”
हेही वाचा – T20 World Cup 2022 : टीम इंडियाचा धक्कादायक पराभव…! राहुलची झुंज अपयशी
#Watch: #SouravGanguly breaks silence on his tenure coming to an end. “Me being a player & who played for a long period of time, I was a cricketer’s administrator. I enjoyed thoroughly as an administrator. You cannot play forever & you cannot remain an administrator forever.” pic.twitter.com/IzpZtKntaO
— Pooja Mehta (@pooja_news) October 13, 2022
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य, रॉजर बिन्नी हे सौरव गांगुली यांच्या जागी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे, तर भाजपचे आमदार आशिष शेलार हे अरुण धुमाळ यांच्या जागी कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त होण्याची शक्यता आहे. जय शाह बीसीसीआय सचिव म्हणून त्यांच्या पदावर कायम राहतील, असे वृत्त आहे.