Cricket : सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अँड्र्यू फ्लिंटॉफ, स्टीव्ह वॉ सारखे खेळाडू त्यांच्या काळातील महान खेळाडू आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले. आता त्यांची मुलेही मैदानावर परंपरा पुढे नेताना दिसत आहेत. ही मुले वडिलांचा वारसा मैदानावर पुढे चालवताना दिसत आहे. समित द्रविड, अर्जुन तेंडुलकर, आर्ची वॉन, रॉकी फ्लिंटॉफ या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.
राहुल द्रविडचा मुलगा समित सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. कूचबिहार ट्रॉफी 2023 मध्ये समित कर्नाटककडून खेळत असताना तो प्रकाशझोतात आला. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना समितने 98 धावांची खेळी केली होती. या काळात त्याने 159 चेंडूंचा सामना केला. या खेळीत त्याने 13 चौकार मारले. टीम इंडियापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काही वर्षे लागू शकतात. दुसरीकडे, सचिन तेंडलूकरचा मुलगा अर्जुन याने अद्याप टीम इंडियासाठी पदार्पण केलेले नाही. मात्र रणजी ट्रॉफीसारख्या स्पर्धेत त्याने आपले कौशल्य दाखवले आहे.
रॉकी फ्लिंटॉफ हा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 19 वर्षांखालील सामन्यात त्याने शतक झळकावले. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने अशी कामगिरी केली. अंडर-19 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला. मायकेल वॉनचा मुलगा आर्ची वॉनही इंग्लंडकडून अंडर-19 सामने खेळत आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह वॉचा मुलगा मायकेल वॉ हा देखील 19 वर्षांखालील संघात ऑस्ट्रेलियाकडून खेळतो.
हेही वाचा –अँड्र्यू फ्लिंटॉफचं पोरगं लय पुढे जाणार! वयाच्या 16व्या वर्षी रचला विक्रम
शिवनारायण चंदरपॉल यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉलही वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो चांगली कामगिरी करत आहे. त्याने 2022 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातच त्याने अर्धशतक झळकावले. त्याने दुसऱ्या डावात 45 धावांची खेळी केली. त्याने आतापर्यंत 10 कसोटीत 560 धावा केल्या आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!