VIDEO : स्मृती मंधानाचे बॅक-टू-बॅक शतक, वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

WhatsApp Group

Smriti Mandhana Record : भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला आहे. आता उभय संघांमध्ये दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने या सामन्यात भारताकडून शतक झळकावत एक खास विक्रम केला. तिने मिताली राजचीही बरोबरी केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाने अप्रतिम फलंदाजी केली. तिने डावाच्या सुरुवातीपासूनच दमदार फलंदाजीचा नमुना सादर केला. तिने 120 चेंडूत 18 चौकार आणि दोन षटकारांसह 136 धावा केल्या. ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मागील सामन्यातही तिने 117 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही भारतीय महिला खेळाडूला सलग दोन शतके झळकावता आलेली नव्हती.

हेही वाचा – आपले शरीर किती उष्णता सहन करू शकते? माहीत नसेल तर ‘हे’ वाचा!

मिताली राजची बरोबरी

स्मृती मंधानाचे वनडे कारकिर्दीतील हे 7 वे शतक आहे. यासह तिने मिताली राजची बरोबरी केली आहे. मितालीने वनडेमध्ये 7 शतके झळकावली आहेत. आता मंधाना, अनुभवी मिताली राजसह, भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारी खेळाडू बनली आहे. मंधानाने भारतासाठी केवळ 84 डावांमध्ये 7 शतके झळकावली आहेत. तर मितालीने 211 डाव ​​खेळून 7 शतके ठोकली होती.

भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या महिला खेळाडू :

  • स्मृती मंधाना – 7 शतके
  • मिताली राज – 7 शतके
  • हरमनप्रीत कौर – 5 शतके
  • पूनम राऊत – 3 शतके

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment