SL vs AFG World Cup 2023 In Marathi : अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी सूरू ठेवली आहे. इंग्लंड, पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानने आता 1996च्या विजेत्या श्रीलंकेला 7 गड्यांनी पराभवाचे पाणी पाजले आहे. यासह ते आता गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे अफगाणिस्तानने श्रीलंकेला 241 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात तीन फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानने ऐतिहासिक विजय साकारला.
श्रीलंकेसाठी सलामीवीर पाथुम निसांकाने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कुसल मेंडिसने (39) समरविक्रमाने (36) अॅजेलो मॅथ्यूजने (23), चरिथ असलांकाने (22) आणि महीष थिक्षणाने (29) छोटेखानी खेळी केल्या. अफगाणिस्तानसाठी फजल उक फारुकीने 34 धावांत 4 विकेट घेतल्यामुळे श्रीलंकेचा संघ अवघ्या 241 धावांवर गडगडला.
हेही वाचा – गाव कारागिरांना मिळणार 3 लाखांचे कर्ज! जाणून घ्या विश्वकर्मा योजना
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाने अफगाणिस्तानचा स्फोटक सलामीवीर रगमानुल्लाह गुरबाजला शून्यावर बाद करत चांगली सुरुवात केली. पण अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादरान (39), रहमत शाह (62) यांनी भागीदारी करत डाव सांभाळला. रहमतशाहने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंत त्यानंतर कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरजाई यांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला 46व्या षटकात विजय मिळवून दिला. शाहिदीने 2 चौकार आणि एका षटकारासह 58 तर ओमरजाईने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 73 धावांची खेळी केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!