Sikandar Raza : झिम्बाब्वे आफ्रो T10 लीग हरारे येथे खेळवली जात आहे. लीगमधील 12 वा सामना बुलावायो ब्रेव्ह्स आणि हरारे हरिकेन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बुलावायोने दणदणीत विजय नोंदवला. झिम्बाब्वेचा सर्वोत्तम फलंदाज सिकंदर रझाने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी केली. या सामन्यात त्याने एकहाती 21 चेंडूत 70 धावा फटकावल्या. प्रथम गोलंदाजी त्याच्यासाठी प्रभावी ठरली.
बुलावायो ब्रेव्ह्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना हरारे हरिकेन्सने 4 गडी गमावून 134 धावा केल्या. पाठलाग करताना बुलावायो ब्रेव्हसने केवळ 9.1 षटकांत ही धावसंख्या गाठली. या सामन्यात सिकंदर रझाकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने केवळ 21 चेंडूत 70 धावा ठोकल्या. इतकेच नाही तर त्याने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जे या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात जलद अर्धशतक होते.
Fastest 50 Of The Tournament (#ZimAfroT10League ) From Sikandar Raza 🔥🔥#ZimAfroT10 #INDvWI #WIvIND pic.twitter.com/aeFnYNLsSq
— Cricket SuperFans (@cricketrafi) July 24, 2023
Sikandar Raza smacks a half century off 15 balls. The fastest in the ZimAfro T10! pic.twitter.com/rxy9UjuO5F
— Adam Theo🇿🇼🏏 (@AdamTheofilatos) July 24, 2023
हेही वाचा – VIDEO : पोलार्ड तात्याचा 110 मीटर गगनचुंबी षटकार, बॉल स्टेडियमबाहेर!
70 runs off 21 balls for Sikandar Raza. 135 chased inside 10 overs 😱🔥🔥 #ZimAfroT10 pic.twitter.com/ZTcHx3EK1Z
— Farid Khan (@_FaridKhan) July 24, 2023
रझाने 70 धावांच्या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकार लगावले. त्यानुसार त्याने केवळ चौकार-षटकारावरून 56 धावा केल्या. उर्वरित 14 धावा त्याने एकेरी किंवा दुहेरी म्हणून घेतल्या. रझाशिवाय या सामन्यात कोब हार्टफनेही झंझावाती खेळी करताना 23 चेंडूत 41 धावा ठोकल्या. त्याने 3 षटकार आणि 3 चौकार मारले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!