पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ सापडला!

WhatsApp Group

Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा महत्त्वाचा सदस्य सचिन बिश्नोई थापन याला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिननंच मूसवालाच्या हत्येची योजना आखली होती. त्यानं शूटरला शस्त्रं पुरवली होती, संपूर्ण लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता. सचिन बिश्नोई थापन हा अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खंडणी आदी गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. मानसा पोलिसांनी त्याला सिद्धू मुसेवाला हत्याकांडातही आरोपी बनवलं आहे.

हत्याकांडाची जबाबदारी…

सचिन बिश्नोई यानं २ जून रोजी एक व्हिडिओ संदेश जारी करून सिद्धू मुसेवाला हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्ली पोलीस आणि पंजाब पोलिसांनी व्हिडिओ संदेशात आवाज सचिन बिश्नोईचा असल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सचिननं संगम विहारच्या पत्त्यावर बनवलेला बनावट पासपोर्ट कसा बनवला आणि अझरबैजानला पळून जाण्यात यश मिळवलं हे सांगितलं. सचिन बिश्नोईबाबत दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी अझरबैजान अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. पंजाब पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयानं सचिनच्या अझरबैजानमधून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पंजाब पोलिसांना पाठवलेल्या पत्रात परराष्ट्र मंत्रालयानं आरोपीचा गुन्हेगारी इतिहास, अटक वॉरंट आणि प्रत्यार्पण जलद करण्यासाठी मुसेवाला हत्येतील त्याची भूमिका याविषयी सर्व तपशील मागवले आहेत.

हेही वाचा – सारा तेंडुलकर नाही, सारा अली खानसोबत फिरतोय शुबमन गिल? VIDEO व्हायरल!

आता लक्ष्य अनमोल बिश्नोई..

याशिवाय तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याचं लोकेशनही शोधण्यात आल्याचं वृत्त आहे. पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अनमोलला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंड म्हणूनही त्याची नोंद करण्यात आली आहे. एआयजी गुरमीत चौहान आणि डीएसपी बिक्रमजीत ब्रार यांच्यासह एडीजीपी प्रमोद बन यांच्या नेतृत्वाखालील अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने अनमोल बिश्नोईचे लोकेशन ट्रेस केले आहे. इथं एजीटीएफ आणि मानसा पोलिसांनी सचिन बिश्नोई थापनच्या प्रत्यार्पणासाठी कागदपत्रं तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा – अभिनेता KRK उर्फ कमाल खानला अटक; मुंबई पोलिसांनी विमानतळावरून घेतलं ताब्यात!

सिद्धू मुसेवालाच्या खळबळजनक हत्येत कथितरित्या सहभागी असलेल्या ४ गुंडांमध्ये सचिन आणि अनमोल यांचा समावेश आहे. गुन्हा करून दोघेही बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पळाले होते. अन्य २ आरोपींमध्ये गोल्डी ब्रार आणि लिपिन नेहरा हे कॅनडात आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की लॉरेन्स बिश्नोईनं त्याचा भाऊ अनमोल आणि जवळचा सहकारी सचिनला वाचवण्यासाठी सुनियोजित कटाचा भाग म्हणून त्याच्यासाठी बनावट पासपोर्ट मिळवले होते. हे पासपोर्ट प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय दिल्लीनं जारी केले आहेत. अनमोलवर १८ फौजदारी खटले प्रलंबित आहेत आणि ते शेवटचे जोधपूर तुरुंगात होते तेथून तो ७ ऑक्टोबर २०२१ रोजी जामिनावर सुटला होता. त्याचप्रमाणे सचिन १२ गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. २९ मे २०२२ रोजी संध्याकाळी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment