कमाई असावी तर शुबमन गिलसारखी! आवडती गाडी घेतली, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक, आणि…

WhatsApp Group

शुबमन गिल…

वय लहान असलं तरी मॅच्युअर्ड क्रिकेटरसारखा तो खेळतो. टेक्निकली स्ट्राँग असणारे खेळाडू लांब आणि मोठ्या शर्यतीचे घोडे बनतात. त्यामुळे शुबमन गिलचेही भविष्य खूप भारी असेल, यात वादच नाही. भारताच्या सर्वोत्तम बॅटर्समध्ये त्याची गणना केली जाते. आयपीएल 2024 मध्ये तो गुजरात टायटन्स या मातब्बर संघाचा कॅप्टन आहे, त्यामुळे त्याचे नेतृत्वगुणही जगासमोर येतील. गेल्या काही काळापासून गिल क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर धावा करत आहे. आयपीएलमध्य त्याने गेल्या मोसमात 800 हून अधिक धावा केल्या होत्या.

5 वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा गिल लवकरच टीम इंडियाचा नवीन स्टार बनल. त्याला भविष्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले जाते. गिलने या काळात भरपूर कमाई केली. त्यांची एकूण संपत्ती (Shubman Gill Total Income) कोटींवर पोहोचली आहे. सध्याच्या टीम इंडियातील स्टायलिश खेळाडू म्हणूनही गिल ओळखला जातो.

8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाबमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुबमन गिलचे शिक्षणही तिथेच झाले. गिलने 2018 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून तो सातत्याने यशाची शिडी चढत गेला. स्टॉक ग्रो या वेबसाइटनुसार शुबमन गिलची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे. तो दर महिन्याला सुमारे 66 लाख रुपये कमावतो. गिलची सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स लाखोंच्या घरात आहेत.

हेही वाचा – सचिन तेंडुलकर महान का आहे, याचं उत्तर ब्रॅड हॉगला दिलेल्या ऑटोग्राफमध्ये मिळेल!

शुबमनला बीसीसीआयचे ग्रेड बी कॉन्ट्रॅक्ट मिळाले असून त्यामध्ये क्रिकेटपटूला 3 कोटी रुपये दिले जातात. गुजरात टायटन्सने त्याला 8 कोटींमध्ये सामील करून घेतले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी त्याला 3 लाख रुपये, कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये आणि एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये मिळतात. गिलकडे अनेक ब्रँड आहेत. तो Tata Capital, CEAT, Gillette, Bharat Pe, My 11 Circle आणि Bajaj Allianz इत्यादींच्या जाहिराती करतो. शुबमनच्या मालकीची सर्वात महागडी कार रेंज रोव्हर एसयूव्ही आहे, ज्याची किंमत 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे महिंद्रा थार आहे. रिअल इस्टेटमध्ये त्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तो पंजाबमध्ये एका आलिशान घरात राहतो.

शुबमन गिलचे त्याच्या सोशल मीडिया पेज इंस्टाग्रामवर 11 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर X (पूर्वीचे ट्विटर) वर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. 2018 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये त्याचा समावेश केला होता. आयपीएलमधून 3 वर्षांची त्याची वार्षिक कमाई सुमारे 2 कोटी रुपये होती. 2022 मध्ये गिलने जबरदस्त झेप घेतली. गिल सध्या ब्रेकमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तो टी-20 आणि कसोटी मालिका खेळताना दिसेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment