Yo-Yo Test : विराट कोहली त्याच्या शानदार फलंदाजीशिवाय त्याच्या उत्कृष्ट फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की अलिकडच्या काळात शुबमन गिलने यो-यो टेस्टमध्ये विराट कोहली (17.2) पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. गिलने सर्वाधिक 18.7 गुण मिळवले. शुबमन गिलपेक्षा जास्त गुण कोणीच मिळवू शकलेले नाही.
असे मानले जाते की जे खेळाडू सर्वात तंदुरुस्त आहेत ते यो-यो चाचणीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतात. यो-यो चाचणी हे खेळाडूंच्या फिटनेसचे मोजमाप करण्याचे प्रमाण आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने अनेकदा यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक गुण पटकावले होते, मात्र यावेळी शुबमन गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात शुबमन गिल मैदानावर दिसला होता. यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडला गेला. शुबमन गिल या संघाचा भाग नव्हता.
हेही वाचा – रक्षाबंधनानिमित्त महिलांना 2 दिवस मोफत बसचा प्रवास, ‘या’ सरकारचं बहिणींना गिफ्ट!
शुभमन गिल आता आगामी आशिया कपमध्ये दिसणार आहे. आशिया कप 2023 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे सामने पाकिस्तान व्यतिरिक्त श्रीलंकेत खेळवले जातील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपल्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. याशिवाय सेमीफायनल आणि फायनलचे सामनेही श्रीलंकेत होणार आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!