शुबमन गिल 450 कोटींच्या घोटाळ्यात अडकलाय!

WhatsApp Group

Shubman Gill : शुबमन गिल चर्चेत आहे. एका रिपोर्टनुसार, तो 450 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकल्याची बातमी आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, शुबमन आणि गुजरात टायटन्सचे अनेक खेळाडू, ज्यात साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा यांचाही समावेश आहे. 450 कोटी रुपयांचा हा घोटाळा गुजरातस्थित कंपनी बीझेड ग्रुपशी संबंधित आहे. या प्रकरणी गुजरात गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजेच सीआयडीने सर्व क्रिकेटपटूंना समन्स पाठवले आहेत.

बीझेड ग्रुपने गुंतवणूकदारांना बँकांपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे न झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार केली. अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनीही पॉन्झी स्कीममध्ये पैसे गुंतवले आहेत. यासंदर्भात आता सीआयडी त्याची चौकशी करणार आहे. अहवालानुसार, गिलने 1.95 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे तर इतर खेळाडूंनी कमी रकमेची गुंतवणूक केली आहे. गिल सध्या ऑस्ट्रेलियात असल्याने सीआयडी परतल्यावर त्याची चौकशी करू शकते.

हेही वाचा – अखेर मनू भाकरला खेलरत्न, डी. गुकेशचेही नाव यादीत, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

वृत्तानुसार, गुजरातच्या सीआयडीने या प्रकरणी अटक केली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बीझेड ग्रुप घोटाळ्याशी संबंधित भूपेंद्रसिंग झाला याला मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली होती.  

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावार शुबमन..

शुबमन गिलच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात दुखापतीने झाली. याच कारणामुळे तो पर्थमध्ये पहिली कसोटी खेळू शकला नाही. त्यानंतर त्याने ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी खेळली, जिथे त्याने पहिल्या डावात 31 धावा आणि दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही, त्यानंतर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले. मात्र, संघ व्यवस्थापनाने हा निर्णय कॉम्बिनेशन लक्षात घेऊन घेतल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा त्याच्या कमबॅकची बातमी आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment