टीम इंडियाचा टॉपचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. आयपीएल 2024 साठी गुजरात टायटन्सने त्याला 15 कोटीसाठी ट्रेड केले. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ट्रेड ठरला. 2015 ते 2021 पर्यंत हार्दिक मुंबईसाठी खेळला. त्यानंतर दोन वर्ष तो गुजरात टायटन्स या नव्या संघाचा कॅप्टन होता. पहिल्याच वर्षी त्याने गुजरातला विजेता केलं. दुसऱ्या वर्षी हार्दिकचा संघ उपविजेता ठरला. आता भविष्यातील विचार बघता रोहितनंतर हार्दिकच मुंबई इंडियन्सला सांभाळणार असे समजते.
हार्दिकला पाठवल्यानंतर गुजरात टायटन्सनेही भविष्याकडे बघत एक मोठा निर्णय घेतला. टीम इंडियाचा स्टार ओपनर, विराटचा उत्तराधिकारी शुबमन गिलला गुजरातने कॅप्टन बनवले. ”शुबमन गिलने गेल्या दोन वर्षांत क्रिकेटच्या सर्वोच्च स्तरावर लक्षणीय प्रगती केली आहे. फक्त एक फलंदाज म्हणून नव्हे, तर क्रिकेटमध्ये एक लीडर म्हणूनही त्याला आपण मॅच्युर्ड पाहिले आहे. मैदानावरील त्याच्या योगदानामुळे गुजरात टायटन्सला एक मजबूत ताकद म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. त्याची मॅच्युरिटी आणि स्किल्स त्याच्या मैदानावरील कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत”, असे गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी सांगितले.
शुबमन आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याच्याकडे ऑरेंज कॅप होती. गिलने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या. केन विल्यमसन, राशिद खानही गुजरात टायटन्सचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत होता, पण भविष्य डोळ्यासमोर ठेवून फ्रेंचायझीने या युवा भारतीय खेळाडूला महत्त्व दिलं. ”गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद होत आहे. एवढ्या चांगल्या संघाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रेंचायझीचे आभार मानतो”, असे कॅप्टन झाल्यानंतर शुबमन म्हणाला.
हेही वाचा – पॅराग्लायडिंगचा आनंद लुटायचाय? वाचा भारतातील 5 सर्वोत्तम स्पॉट्स!
24 वर्षीय शुबमन गिलने 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37.70 च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 129 धावा आहे. गिलने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 273 चौकार आणि 80 षटकार मारले आहेत. आयपीएल 2023 च्या लिलावापूर्वी गिलला गुजरात टायटन्सने 8 कोटी रुपयांना संघात घेतले होते.
विल्यमसन, राशिद यांना डावलले..
ऑक्शनपूर्वी गुजरातसाठी केन विल्यमन उत्तम पर्याय होता. त्याला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. तो न्यूझीलंडचा कर्णधार आहे, आणि त्याने अनेक वेळा आपल्या संघाला आयसीसीच्या टूर्नामेंटच्या बाद फेरीपर्यंत नेले आहे. याशिवाय त्याला आयपीएलमधील कर्णधारपदाचाही भरपूर अनुभव आहे. सनरायझर्स हैदराबादचे त्याने नेतृत्व केले आहे. तो जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाने अनेक वेळा जगभरातील महान क्रिकेटपटूंना प्रभावित केले आहे. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानची गुजरात संघात खूप महत्त्वाची भूमिका आहे. राशिद गेल्या दोन वर्षांपासून गुजरात संघाचा उपकर्णधारही होता. हार्दिकच्या अनुपस्थितीत त्याने अनेकदा गुजरातचे कर्णधारपदही भूषवले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!