

Shreyas Iyer In Ranji Trophy | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) कारवाईनंतर श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी त्याच्या संघात सामील झाला आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अय्यरचे संघात स्वागत केले असून अय्यरने केंद्रीय करार विसरून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूविरुद्धच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अय्यरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. मुंबईला अय्यरकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल. रहाणेणे सांगितले की, आता सर्वांनाच अय्यरची प्रतिभा माहित आहे आणि त्याला काहीही सांगण्याची किंवा समजावून सांगण्याची गरज नाही. तो खूप अनुभवी आहे आणि त्याचे संघात पुनरागमन अप्रतिम आहे.
श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे मुंबईच्या बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून बाहेर पडला होता. सामन्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, अय्यर हा अनुभवी खेळाडू आहे. आता तो मुंबईसाठी योगदान देत आहे, हे खूप छान होणार आहे. उपांत्य फेरीसाठी त्याला आमच्या संघात घेऊन आम्ही खूप रोमांचित आहोत. अय्यरला तामिळनाडूविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी अतिरिक्त प्रेरणेची गरज नाही.
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी 6 कोटीवर निधी वितरणास मान्यता
रहाणे म्हणाला की अय्यरने मुंबईसाठी नेहमीच चांगले योगदान दिले आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थिती इतर खेळाडूंनाही मदत करेल. आतापर्यंत रहाणेला रणजीमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने सहा सामन्यांमध्ये 12.77 च्या सरासरीने केवळ 115 धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना रहाणे म्हणाला की, माझ्या तंत्रात काहीही चूक नाही. मला फक्त सकारात्मक राहून माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.
रणजीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीबद्दल बोलायचे झाले तर, तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा निर्णय चुकीचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. तामिळनाडूने 42 धावांवर आपले आघाडीचे पाच फलंदाज गमावले आहेत. तुषार देशपांडेने तीन बळी घेतले. साई सुदर्शन, एम जगदीसन, प्रदोष पॉल आणि साई किशोर यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाचवा फलंदाज म्हणून बाबा इंद्रजीत 11 धावा करून बाद झाला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!