IND vs PAK : शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य! म्हणाला, “जर तुम्ही भित्रे असाल तर…”

WhatsApp Group

Shoaib Akhtar On IND vs PAK Match In Marathi : वर्ल्डकपमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (World cup 2023 IND vs PAK) यांच्यात क्रिकेटचा सर्वात मोठा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. दोन्ही देशांनी पहिले दोन सामने जिंकले आहेत. आता सर्वांची नजर विजयाच्या हॅट्ट्रिकवर असेल. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

अख्तर RevSports वर म्हणाला, “जर तुम्ही धाडसी असाल, तर तुम्ही भारत-पाकिस्तान सामन्याचा पुरेपूर आनंद घ्याल. जर तुम्ही भित्रे असाल तर… मग हा सामना कमकुवत ह्रदय असणाऱ्यांसाठी नाही. ही स्पर्धा अशा लोकांसाठी किंवा खेळाडूंसाठी आहे ज्यांना स्वतःसाठी मोठे नाव हवे आहे. स्वत:ला सुपरस्टार बनवायचे आहे.”

हेही वाचा – Petrol Diesel Price In Marathi: कच्च्या तेलात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

अख्तरने (Shoaib Akhtar News In Marathi) स्पष्ट केले की पाकिस्तान संघ भारताइतका दबावाखाली का येणार नाही. भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानणे हे पाकिस्तान संघाला मदत करण्यासारखे आहे.

शोएब अख्तर म्हणाला, “गेल्या वर्षी मी दुबईत होतो. मी एका भारतीय चॅनेलवर शो करत होतो. त्या चॅनलवर फक्त एकच गोष्ट बोलली जात होती की टीम इंडिया पाकिस्तानला चिरडून टाकेल. असा दबाव कोण निर्माण करतो? जेव्हा तुम्ही पाकिस्तानला निकृष्ट संघ म्हणता तेव्हा आमच्यावरून दबाव काढला जातो. आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही.”

अख्तरकडून बाबरला पाठिंबा (IND vs PAK News In Marathi)

शोएब अख्तर म्हणाला, ”मला विश्वास आहे की पाकिस्तानला तिथे जाऊन भारताला पराभूत करणे सोपे जाईल कारण प्रायोजक आणि टीव्ही अधिकारांचा दबाव तुमच्यावर असेल, आमच्यावर नाही. बाबर आझम आणि कंपनीने आक्रमक आणि हुशारीने खेळले पाहिजे. तुम्ही भारताला हरवा आणि अहमदाबादमध्ये फायनल खेळा. मी तुमच्यासोबत आहे.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment