Shimron Hetmyer Dropped T20 World Cup Squad : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून विश्वचषकाचा भाग होण्यासाठी मेहनत घेत आहेत, तर काही खेळाडू विश्वचषकापूर्वीच दुखापतींमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र, वेस्ट इंडिज क्रिकेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज शिमरॉन हेटमायर टी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे.
हेटमायरला एक घोडचूक नडली आहे. ऑस्ट्रेलियाला जाणारे विमान चुकवल्यामुळे हेटमायरविरुद्ध बोर्डाने कठोर निर्णय घेत त्याला टी-२० विश्वचषक संघातून वगळले आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजच्या संघात हेटमायरऐवजी शेमर ब्रूक्सला स्थान देण्यात आले आहे. मंडळाने सोमवारी ही घोषणा केली. “शिमरॉन हेटमायरने ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्याची रिशेड्युल फ्लाइट चुकवली, जी त्याच्या कौटुंबिक कारणास्तव त्याच्या विनंतीनुसार शनिवार १ ऑक्टोबरपासून बदलण्यात आली. आता CWI (क्रिकेट वेस्ट इंडिज) निवड समितीने त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे बोर्डाने म्हटले आहे.
हेही वाचा – CNG आणि PNG च्या किमती आजपासून वाढल्या..! ‘असे’ आहेत नवे दर
Shimron Hetmyer has been dropped from West Indies' squad for the #T20WorldCup after missing his flight to Australia.
Shamarh Brooks has been selected as his replacement pic.twitter.com/ZLBWuYUc4J
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 3, 2022
या घटनेनंतर लोकांनी हेटमायरला ट्रोल केले.
Missed the flight? Twice?#ShimronHetmyer pic.twitter.com/y0lzWeZtmA
— KnightRidersXtra (@KRxtra) October 4, 2022
Shimron Hetmyer to the flight going for the world cup : pic.twitter.com/BOeUOlv0EZ
— UmderTamker (@jhampakjhum) October 4, 2022
Shimron Hetmyer on to the next flight pic.twitter.com/LfSKa4l9Mp
— mon (@4sacinom) October 4, 2022
“आज दुपारी आम्ही CWI संचालक मंडळाला कळवले की निवड समितीने एकमताने शिमरॉन हेटमायरच्या जागी शेमर ब्रूक्सला आमच्या विश्वचषक संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक कारणास्तव आम्ही शिमरॉनची फ्लाइट शनिवार ते सोमवार बदलली. ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी आणखी काही विलंब आणि समस्या आल्यास, त्याचा पर्यायी खेळाडू पाठवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेसाठी संघाच्या क्षमतेशी आम्ही तडजोड करण्यास तयार नाही, हे हेटमायरला स्पष्ट केले होते”, असे CWI चे क्रिकेट संचालक जिमी अॅडम्स म्हणाले.