धोनी, रोहित, विराटला जे जमलं नाही ते करून दाखवणारा कॅप्टन…शिखर धवन!

WhatsApp Group

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर इतिहास रचला आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या दिग्गजांनाही धवननं आपल्या कर्णधारपदाखाली जे यश मिळवून दिलं ते मिळवता आलं नाही. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा त्याच्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-०असा क्लीन स्वीप केला. अशाप्रकारे धवन त्यांच्या घरच्या मैदानावर द्विपक्षीय वनडे मालिकेत विंडीजला क्लीन स्वीप करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

टीम इंडियानं पहिल्यांदा १९८३मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळली होती. त्या पहिल्या मालिकेत भारताचा १-२ असा पराभव झाला होता. त्यानंतर १९८८ आणि १९९६ मध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने २०२२ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पहिली वनडे मालिका जिंकली होती. त्यावेळी सौरव गांगुली कर्णधार होता आणि त्याने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी जिंकली होती. आतापर्यंत, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर म्हणजेच कॅरेबियन भूमीवर १० एकदिवसीय मालिका खेळला होता, ज्यामध्ये चार मालिका वेस्ट इंडिजच्या नावावर होत्या, तर भारतीय संघाने ६ मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियानं जून २००९ पासून वेस्ट इंडिजमध्ये एकही वनडे मालिका गमावलेली नाही.

रोहितचा विक्रम..

तसं पाहिलं तर, टीम इंडियानं केवळ दोनदाच एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा सुपडा साफ केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच असं घडले. त्यानंतर वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव झाला. त्या विजयासह रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार बनला ज्याच्या नेतृत्वाखाली भारतानं एकदिवसीय मालिकेत विंडीजचा पराभव केला होता. मात्र, ही मालिका भारतीय भूमीवर खेळवली गेली. आता धवनच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या मालिकेत क्लीन स्वीप.
टीम इंडियानं मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमानांचा डकवर्थ लुईस नियमानुसार ११९ धावांनी पराभव केला.

वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिका (भारत)

  • १९८३ वेस्ट इंडिज – २-१ विजय
  • १९८८-८९ वेस्ट इंडिज – ५-० विजय
  • १९९६-९७ वेस्ट इंडिज – ३-१ विजय
  • २००२ भारत – २-१ विजय
  • २००६ वेस्ट इंडिज – ४-१ विजय
  • २००९ भारत – २-१ विजय
  • २०११ भारत – ३-२ विजय
  • २०१७ भारत – ३-१ विजय
  • २०१९ भारत – २-० विजय
  • २०२२ भारत – ३-० विजय
Leave a comment