IPL 2023 Shardul Thakur : दिल्ली कॅपिटल्सने मराठमोळा खेळाडू शार्दुल ठाकूरला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १५ नोव्हेंबरच्या कायम ठेवण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी सोडले आहे. शार्दुल आता कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) खेळणार आहे. शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने लिलावात १० कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले. २०२२च्या मोसमात त्याने १४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या पण या कालावधीत त्याने प्रति षटक सुमारे १० धावांच्या धावगतीने धावा दिल्या. ठाकूरला १०.८१च्या सरासरीने आणि १३७.९३च्या स्ट्राईक रेटने फलंदाजीत १२० धावा करता आल्या.
शार्दुल ठाकूरची दुसऱ्या संघात अदलाबदल व्हावी, अशी दिल्ली कॅपिटल्सची इच्छा होती. ठाकूरची प्रचंड किंमत लक्षात घेऊन फ्रेंचायझी डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावापूर्वी त्याला सोडण्याची तयारी केली. आयपीएलच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “शार्दुल हा एक अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे पण त्याची किंमत हा एक मुद्दा आहे. हेब्बर, मनदीप, सेफर्ट आणि भरत हे देखील रिलिज जाऊ शकतात.
KKR continue to make moves in the IPL trading window, bring in Shardul Thakur from Delhi Capitals in an all-cash deal
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 14, 2022
हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन; सिनेसृष्टीत हळहळ
Shardul Thakur will be playing for Kolkata Knight Riders in IPL 2023. (Source – Espn Cricinfo)
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2022
आयपीएलच्या १६व्या हंगामाची तयारी जोरात सुरू आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. प्रत्येक संघाला ५ कोटी रुपये अतिरिक्त रक्कम देण्यात आली आहे, ज्यामुळे २०२३ च्या मिनी-लिलावाची रक्कम ९५ कोटी रुपये झाली आहे.