Shaheen Afridi Gave A Gift To Jasprit Bumrah : संततधार पावसामुळे श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या आशिया चषकाचे (Asia Cup 2023)सामने विस्कळीत झाले आहेत. संपूर्ण स्पर्धेत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संततधार पावसामुळे रविवारी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरचा सामना राखीव दिवसासाठी पुढे ढकलावा लागला. येथील प्रेमदासा स्टेडियमवर पावसामुळे खेळ थांबला, तोपर्यंत भारताने 24.1 षटकांत 2 बाद 147 धावा केल्या होत्या. आता येथून आज दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल. याचा अर्थ काल खेळल्यानंतर भारतीय संघाला सुपर फोरच्या पुढील सामन्यात 24 तासांपेक्षा कमी कालावधीत श्रीलंकेशी खेळावे लागणार आहे.
आफ्रिदीकडून बुमराहला भेट
भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी, पाकिस्तान क्रिकेटने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भेट देताना दिसत आहे. नुकताच बुमराह बाप झाला आहे, या कारणामुळे आफ्रिदीने बुमराहचे अभिनंदन केले.
हेही वाचा – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, देवगडच्या बापर्डे गावचा सन्मान!
विराट-राहुल क्रीजवर…
विराट कोहली (8) आणि केएल राहुल (17) अधिक धावा करून क्रीजवर आहेत. सलामीवीर रोहित शर्मा (56) आणि शुबमन गिल (58) अर्धशतके झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप गटातील सामनाही पावसामुळे वाहून गेला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!