WPL 2024 | दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने महिला क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. गोलंदाजी करताना ताशी 130 किमीचा वेग पार करणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. इस्माईलने दिल्लीत ही ऐतिहासिक कामगिरी केली.
इस्माईलने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील WPL 2024 सामन्यात 132.1 किलोमीटर प्रतितास (82.08 mph) वेगाने चेंडू टाकला, ज्याची प्रसारणावरील स्पीड-गनद्वारे नोंद झाली. इस्माईल डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळत आहे.
सामन्याच्या तिसऱ्या षटकात शबनिमने टाकलेला दुसरा चेंडू आता महिला क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंदला गेला आहे. इस्माईलने दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगला हा चेंडू टाकला. लॅनिंग हा चेंडू खेळू शकली नाही, तो पॅडला लागला. त्यानंतर मुंबईने एलबीडब्ल्यूचे अपील केले, पण ते फेटाळण्यात आले.
हेही वाचा – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळासाठी १० कोटींचा निधी
इस्माईलने डब्ल्यूपीएल 2024 स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात कॅपिटल्सविरुद्ध ताशी 128.3 किमी वेगाने चेंडू टाकला. दुखापतीमुळे ती मुंबईसाठी काही सामने खेळू शकली नाही, पण 5 मार्चला ती पुन्हा मैदानात आली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूची नोंदही इस्माईलच्या नावावर आहे, तिने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ताशी 128 किमी वेगाने चेंडू टाकला होता. 2022 च्या एकदिवसीय विश्वचषकातही तिने 127 किमी प्रतितास वेग दोनदा ओलांडला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!