गूड न्यूज..! संजू सॅमसन बनला भारतीय संघाचा कर्णधार; वर्ल्डकपमधून डावललं, पण…

WhatsApp Group

Sanju Samson to lead India A : अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड “अ” संघाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मास्टरकार्ड एकदिवसीय मालिकेसाठी भारत “अ” संघाची निवड केली आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला भारताचा कप्तान बनवण्यात आलं आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात सॅमसनला स्थान मिळालं नाही. परंतु आता सॅमसन भारतीय संघाचा कप्तान झाल्यामुळं त्याच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

सॅमसनची अलिकडील कामगिरी

सॅमसननं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यामध्ये ११ चेंडूत १५ , चौथ्या टी-२० सामन्यामध्ये  २३ चेंडूत ३० आणि आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ४२ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याचवेळी, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये  सॅमसनच्या बॅटमधून ३९ आणि तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये १८ धावा झाल्या. त्याचवेळी सॅमसननं वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या.

हेही वाचा – IPL स्पॉट फिक्सिंग, मुंबई मॉडेल, कपडे विक्री आणि पाकिस्तानी अंपायर असद रौफ!

संजूला २०१५ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. या सात वर्षांत त्याने केवळ १६सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २९६ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, गेल्या वर्षी त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, ज्यामध्ये त्याला ७ सामन्यांच्या ६ डावांमध्ये खेळायला मिळालं याशिवाय तो जेव्हा आयपीएलमध्ये खेळतो तेव्हा तो संपूर्ण हंगाम आपल्या संघासाठी खेळतो.

भारत अ आणि न्यूझीलंड अ संघाच्या मालिकेचे सामने :

  • २२ सप्टेंबर – पहिली वनडे – एम ए चिदम्बरम स्टेडियम
  • २५ सप्टेंबर – दुसरी वनडे – एम ए चिदम्बरम स्टेडियम
  • २७ सप्टेंबर – तिसरी वनडे – एम ए चिदम्बरम स्टेडियम

भारत अ संघ :

पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, अभिमन्यू ईश्वरन, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, शाभाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर , उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा.

हेही वाचा – IPL 2023 : मुंबई इंडियन्स तय्यार..! मिळाला ‘नवा’ हेड कोच; RCB कडून खेळलाय पठ्ठ्या!

टी-२० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment