Sanju Samson Ranji Trophy : टीम इंडियातून बाहेर पडणारा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या त्याच्याकडे होणाऱ्या दुलर्क्षपणामुळे चर्चेत आहे. संजू सॅमसनवर अन्याय होत असल्याबद्दल चाहते सतत आवाज उठवत असतात. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही संजू सॅमसनला संधी मिळाली नाही, दरम्यान संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये मंगळवारी केरळ आणि झारखंड यांच्यात सामना झाला, येथे केरळने प्रथम फलंदाजी केली. आणि कर्णधार संजू सॅमसनने आपल्या संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. संजू सॅमसनने १०८ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ चौकार आणि ७ षटकार होते.
Sanju Samson starts Ranji Trophy 2022-23 season with a good fifty. pic.twitter.com/p17LwhUj6u
— CricTracker (@Cricketracker) December 13, 2022
हेही वाचा – FIFA World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये कोणते संघ खेळणार? कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही
संजू सॅमसनने आपल्या डावात १४ एकेरी धावा काढल्या, तर बाकीच्या सर्व धावा चौकारावर जमा झाल्या. त्याने ८३ डॉट बॉल खेळले आणि यावेळी त्याचा स्ट्राइक रेट ६६.६७ होता. केरळकडून या डावात रोहन प्रेम (७९) आणि रोहन एस. (५०) धावाही केल्या.
२८ वर्षीय संजू सॅमसन सतत टीम इंडियामध्ये आणि बाहेर असतो. २०१५ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनने आतापर्यंत फक्त १६ टी-२०, ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ३३० एकदिवसीय, २९६ टी-२० धावा आहेत.
SIX…. Straight six by Sanju Samson. 4th Six of his innings#JHAvKER #RanjiTrophy pic.twitter.com/vhxIrIvSD8
— ജയനിസം ᵇʳᵘᵗᵘ 🇦🇷 (@Brutu24) December 13, 2022
नुकत्याच झालेल्या बांगलादेश मालिकेत संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही. संजू सॅमसनने गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, तर त्याने शेवटचा टी-२० सामना ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
ऋषभ पंतच्या वाईट कामगिरीनंतर संजू सॅमसनला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्याची मागणी केली जात होती, जेणेकरून सॅमसनला पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी तयार करण्यात येत असलेल्या संघामध्ये संधी मिळू शकेल.